पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पारधी कुटुंबातील लहान मुलांना शाळेचे साहित्य वाटप.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये 26/11 शहिद दिन व संविधान दिन अनुषंगाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व शहिदांना श्रद्धांजली वाहून संविधान दिन शपथ घेणेत आली. त्याचबरोबर एक गाव एक गणपती व गणराया अवॉर्ड 2022 व दुर्गा उत्सव अवॉर्ड  मध्ये विविध गावांमध्ये गावांमधून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मंडळी व दुर्गा उत्सव यांना बक्षीस वितरण डॉ. ओंकार हिंदरे व पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांचे हस्ते वितरण करण्यात आले कार्यक्रमास पोलीस कर्मचारी विविध गावचे पोलीस पाटील  व गणेश मंडळे ,नवरात्र उत्सव मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी पुसेगाव पोलीस ठाणेचे  वतीने परिसरातील पारधी कुटुंबातील लहान मुलांना वही,अंकलिपी, पेन,पेन्सिल अशा शालेय वस्तूंचे वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले  यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला तर पालकांना मुलांना शिक्षण द्या व शाळेत पाठवा असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे म्हणाले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.