तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा व निवृत्त शिक्षकांचा नेटका स्नेहमेळावा उत्साहात.

तब्बल चाळीस वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा भरली
 पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा व निवृत्त शिक्षकांचा नेटका स्नेहमेळावा उत्साहात.

सातारा 24 तास न्यूज 
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 

‘अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती' याप्रमाणे येथील सेवागिरी विद्यालयात चाळीस वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी दि. 6 रोजी आयोजित केला होता. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधीपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळय़ात 1981-1982 बॅचचे  विद्यार्थी आणि शिक्षकवृंद मोठय़ा हीरारीने सहभागी झाले होते.  
पुणे येथील संस्कृती प्रकाशनच्या संस्थापिका आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, आदर्श कामगार पुरस्कार विजेते सोमनाथ उर्फ राजेंद्र कोरे, सातारा येथील बांधकाम व्यावसायीक अनिल मुगुटराव जाधव, केतन काटकर, विठ्ठलराव तोडकर, संजय शंकर जाधव, जयश्री कदम, उषा क्षिरसागर, छाया कुंभार, राजेंद्र तारळकर, नामदेव जाधव, इत्यादी विद्यार्थी तसेच सेवागिरी हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. डी. जाधव यांनी या मेळाव्याचे नियोजन केले होते.        
प्रारंभी सर्व माजी शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे फेटे बांधून मिरवणुकीने जंगी स्वागत झाल्यानंतर स्नेहमेळाव्यास सुरूवात झाली. सदरप्रसंगी माजी शिक्षिका ए. डी. बिचकर मॅडम, टी. जे. सणस, बी. वी. बोडके, एन. के. लोखंडे, एस. व्ही. वीर, आर. ए. सावंत, एम. के. भोसले, एस. एम. भोसले मॅडम, ए. जे. कुदळे, दिलीपराव लिपारे व हायस्कुलचे मुख्याध्यापक जाधव इत्यादी उपस्थित होते.  
यावेळी आपल्या प्रमुख भाषणात सुंदरगिरी महाराज म्हणाले, एखाद्या पर्वतापेक्षाही मोठे शैक्षणिक सेवेचे कार्य करणाऱया कर्मवीर अण्णांच्या व अध्यात्मिक शक्तीने दिव्यत्वाची प्रचिती करुन देणाऱया श्री सेवागिरी महाराज यांच्या आशीर्वादावर सुरु झालेल्या या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबर शाळेचे नावही मोठे केले आहे. हाच वारसा पुढे शाळेने व शिक्षकांनी सुरु ठेवावा.
महाराष्ट्रासह संपूर्ण जगात रयतचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून गोर-गरिब व सामान्यांची संस्था म्हणून आजही रयत शिक्षण संस्थेचाच उल्लेख होतो. ग्रामीण भागात शेतकऱयांच्या मुलांना सुशिक्षीत करुन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम या विद्यालयाने केले असल्याचे मत देवस्थानचे चेअरमन बाळासाहेब मुगुटराव जाधव यांनी व्यक्त केले.  
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपापली शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्वांना सन्मानचिन्ह व संस्कृती प्रकाशनच्यावतीने पुस्तके देऊन गौरविले.  
व्यासपिठावर देवस्थानचे विश्वस्थ संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, माजी मुख्याध्यापक एम. आर. जाधव, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मोहनतात्या जाधव, संतोष बाबूराव जाधव व मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी किसन श्रीरंग फडतरे, राजेंद्र बाचल, निर्मला घाडगे, हसीना बागवान, मालती कांबळे, नंदा मसणे, सुरेखा जावळे, शोभा क्षीरसागर, उज्वला पंडीत, अलका जाधव, सौ. रंजना मधुकर भोसले, सुधीर घाडगे, धनंजय जाधव, रघुनाथ हजारे, रूपेश जाधव, चंदू देवकर, सुनील मांडवे, नितीन चव्हाण, अर्जून माळी व ग्रामस्थ उपस्थित होते. लातुरचे राजू व्होरे यांनी संगित संयोजन, राजेंद्र कोरे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन विठ्ठलराव तोडकर यांनी केले.

सर्वांना अनोखी ज्ञान भेट
पुणे येथील संस्कृती प्रकाशनच्या वतीने सर्वांना ‘कांडा' आणि पुसेगाव व्याख्यानमालेचा सुवर्णनगरीचा ‘सुवर्ण शब्द ठेवा' हा व्याख्यान संग्रह मान्यवरांच्या हस्ते ही अनोखी ज्ञानाची भेट देण्यात आली. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.