बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर.

बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर.


पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.


बुध ता.खटाव येथील राज्य राखीव पोलीस दलामधून हल्लीच सेवानिवृत्त झालेले बुध गावचे रहिवासी श्री. अंकुश ज्ञानदेव जगदाळे यांना यावर्षीचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांचेवतीने नक्षलग्रस्त विभागामध्ये प्रभावी कामगिरीसाठीचे विशेष सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग म्हणून जाहीर आहे. या जिल्ह्यांमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना राजयचे पोलीस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांनी एका आदेशाद्वारे  विशेष सेवा पदके जाहीर केलेली आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश जगदाळे यांनी सेवकाळात अत्यंत काटेकोरपणे व दक्षपणे सेवा केल्याबद्दल त्यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. श्री जगदाळे यांनी भारतीय सैन्य दल व राखीव पोलीस दल यामध्ये एकूण तब्बल ३५ वर्षे सेवा बजावलेली आहे.राखीव पोलीस दलामध्ये काम करीत असताना अठरा वर्षांच्या सेवेत त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक कर्तव्य कठोर,अभ्यासू, मेहनती व विश्वासू अशी प्रतिमा निर्माण केली होती.त्यापूर्वी अंकुश जगदाळे हे भारतीय सैन्य दलाच्या आर्मी सिग्नल कोअरमध्ये  कार्यरत होते. फोंडा, मथुरा, पठाणकोट व मथुरा येथे त्यांनी सैन्य दलातील त्यांची सतरा वर्षांची सेवा बजावलेली आहे.कर्तव्यतील चोखपणामुळे जम्मू काश्मीर परिसरात सैन्याच्या डेल्टा फोर्समध्येही काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.गावच्या शैक्षणिक व सामाजिक घडामोडीत नेहमी आर्थिक योगदान देणारे जगदाळे संपूर्ण जीवन संरक्षणसंबंधी धकाधकीच्या सेवेत घालविल्यानंतर निवृत्तीनंतर आवडीच्या शेती क्षेत्रात रमले आहेत. मात्र त्यांनी त्यांची दोन्ही मुले आग्रहपूर्वक देशसेवेसाठी सैन्यात भरती केली आहेत.अंकुश जगदाळे यांच्या सन्मानाने बुध गावच्या किर्तीत मानाचा तुरा खोवला आहे अशा शब्दांत बाळासाहेब इंगळे, अशोक पुरे, किशोर जगदाळे, राज्यकोषागार प्रमुख वैभव राजेघाटगे,अपरजिल्हाधिकारीनानासाहेबजगदाळे,सरपंच अभयराजे घाटगे, पो नि अजय त्रिपुटे, प्रा हणमंत फडतरे इ मान्यवरांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.