येस ग्रुपच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. प्रियाताई शिंदे.
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
येस ग्रुप शेतकऱ्यांना करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे घेऊन जात असून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचा मोठा आधार येस ग्रुपच्या माध्यमातून मिळाला आहे असे मत डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त पुसेगाव ता. खटाव येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी व येस ग्रुप च्या कृषी स्टॉलला भेट दिली यावेळी डॉ . प्रियाताई शिंदे यांनी मत व्यक्त केले यावेळी येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत, व्यवस्थापक रंजीत भोसले, चंद्रकांत जाधव सर उपस्थित होते
येस ग्रुपचे अभिनव उपक्रम हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत कंपनीच्या माध्यमातून विविध योजना ज्या चालवल्या जातात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, करार शेतीच्या माध्यमातून शेतमाला दराचे टेन्शन घालवण्याचे मोठे काम येस ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे असेही मत डॉ. प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केले व त्यापुढे म्हणाल्या शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण , उत्तम प्रतीचे बियाणे देऊन त्याचा एकरी उत्पादन खर्च 20 टक्के कमी करत आहे व उत्पादन 20 टक्क्यांनी वाढवणे याचे चांगले परिणाम खटाव परिसरात दिसून येत आहेत.डॉ. प्रियाताई शिंदे यांनी स्वतःची पूर्ण शेती करार पद्धतीने येस ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी नोंद केली व चिकित्सकपणे सर्व बियाण्यांची व योजनांची माहिती सविस्तर घेतली असे संस्थापक संजय भगत यांनी सांगितले.
येस ग्रुपच्या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होईल......करार शेतीमुळे फिक्स दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात व शेतकरी कर्जबाजारीपणा कमी होण्यास मदत होईल डॉ. प्रियाताई शिंदे.
Comments
Post a Comment