फेर निवडीबद्दल डि के पवार यांचा सत्कार उत्साहात संपन्न.
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
फलटण. मा. डी के पवार माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदा डेअरी मुंबई यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महाराष्ट्र शासन संचालक पदी फेर निवड झाल्याने मानव अधिकार फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा व फलटण तालुका कमिटी यांच्या वतीने कलारत्न सहकारी मुद्रणालय नाना पाटील चौक फलटण येथे सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी सत्काराला उत्तर प्रसंगी आपण केलेले समाजकार्याची पावती आपल्याला मिळत आहेत परंतु फलटण तालुक्यातील मित्रपरिवारांनी जे प्रेम माझ्यावर केले जी साथ दिली ती शेवटपर्यंत देऊ असे मनोगत डी के पवार यांनी सत्कार्त सर्वांचे आभार व्यक्त केले या सत्कार प्रसंगी मानव अधिकार फाउंडेशन सातारा जिल्हा व फलटण तालुका कमिटी व कलारत्न सहकारी संस्थेचे पदाधिकारी प्रियदर्शनी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment