मा. तहसीलदार साहेब यांच्या आश्वासनानंतर वर्धनगड शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते मागे.

मा. तहसीलदार साहेब यांच्या आश्वासनानंतर वर्धनगड शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन  तात्पुरते मागे. 

 पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.

वर्धनगड ता. खटाव येथील शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन मा.तहसीलदार साहेब खटाव यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे.
वर्धनगड तालुका खटाव येथील पाणंद रस्त्याबाबत योग्य न्याय मिळत नसल्याकारणाने आज दिनांक पाच रोजी पानंद रस्त्या अंतर्गत किल्ले वर्धनगड शेतकऱ्यांच्या वतीने आत्मदहन करण्यासाठी तहसीलदार कार्यालय वडूज जाण्यापूर्वीच पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मा.तहसीलदार साहेब  खटाव आपल्या मागण्यासाठी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगून ग्रामस्थांचे आत्मदहन थांबवण्यात आले व खटाव तहसीलदार व ग्रामस्थांमध्ये चर्चा करण्यात आली त्यावेळी बोलताना खटाव तहसीलदार यांनी सांगितले तुमच्या निवेदनानंतर दोन ते चार तहसीलदार या जागी बदलून गेले आहेत मी या ठिकाणी या वर्षांमध्ये आहे तुमची असणारी समस्या स्थळ पाणी करून एक महिन्याचे आत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून तुमच्या रस्त्या संबंधी येणाऱ्या अडी  अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पानंद रस्त्या अंतर्गत येणाऱ्या वर्धनगड शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आत्मदहन आंदोलन मागे घेतले आहे. या आत्मदहन आंदोलनासाठी  उमेश मोरे, नितीन घोरपडे, अकबर भालदार, किशोर घोरपडे, आंनदराव घोरपडे. नितीन सावंत, महादेव सावंत, कृष्णात माने,विष्णू वाघ, शिवाजी अनपट.मोहन अनपट.सूर्यकांत सावंत.सौ. बबइ मोरे.सौ. सलमा भालदार. इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.