हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार.
हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार.
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेज च्या एच एस सी विज्ञान 2004-05 च्या बॅच चा माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा दिनांक 25 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला . यावेळी 17 वर्षा नन्तर पुन्हा एकदा 12 वी वर्ग भरवण्यात आला , मराठी केमिस्ट्री फिजिक्स भूगोल इ. विषया वर लेक्चर्स घेण्यात आली. इतक्या वर्षा नन्तर उपस्थित सर्व विद्यार्थी विदयार्थीनी पुन्हा एकदा मन लावून शिकताना दिसत होते. त्यांनतर काही फनी गेम्स घेण्यात आल्या. स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या बुधावले सर भांभुरे सर पवार सर निर्मळे मॅडम यांचा आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला , विद्यार्थी अमोल मदने सुशांत जाधव महेश पांडेकर आणि विद्यार्थ्यांनी सुप्रिया जाधव , शारदा जाधव , शिल्पा गोडसे , अमृता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले , सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच मागच्या 30 वर्षातील सर्वात मोठा सुंदर व अविस्मरणीय असा स्नेहमेळावा झाल्याचे समाधान व्यक्त केले . स्नेहमेळाव्यासाठी आकर्षक अशा मंडपाची, साउंड सिस्टम व स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती . विद्यार्थी अड धंनजय सावन्त यांनी सूत्र संचालन केले व धीरज जाधव यांनी आभार व्यक्त केले. स्नेहमेळाव्याच्या यशस्वीतेसाठी साठी उर्मिला निकम शारदा जाधव , अमोल मदने विशाल जाधव , वैभव चव्हाण दिग्विजय चव्हाण संभाजी साळुंखे विनोद साळुंखे धीरज जाधव , यांनी प्रयत्न केले .
Comments
Post a Comment