कोरेगाव जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध; जैन समाजाचा बंदला शंभर टक्के प्रतिसाद.
कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.
कोरेगाव जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध; प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन सादर, कोरेगावात जैन समाजाच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या झारखंड राज्यातील तीर्थक्षेत्र श्री. सम्मेद शिखरजी या क्षेत्राला राज्य सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. पर्यटनाच्या नावाखाली या तीर्थक्षेत्रातील पावित्र्य भंग होणार असून त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतातील जैन समाज बांधवांनी बुधवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला कोरेगाव शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन उर्फ बच्चु शेट ओसवाल व श्री. आशिष शेटीया अध्यक्ष. श्री. छगनलाल ओसवाल उपाध्यक्ष. श्री. अशोक टेडीया श्री .विश्वस्त डॉक्टर सागर भंडारी, प्रवीण ओसवाल प्रसन्न भंडारी राजेंद्र शहा राजेंद्र रमणलाल गांधी, अशोक देधीया, निलेश देवीचंद ओसवाल, नथमल जैन राजेंद्र ओसवाल, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रीतमशेठ शहा, यांच्यासह समाज बांधवांनी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.झारखंड राज्य सरकारने पर्यटनाच्या नावाखाली जैन समाजाच्या पवित्र तीर्थक्षेत्राला बाजार बनविण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. जैन धर्मियांचे २४ तीर्थंकर असून त्यापैकी २० तीर्थंकर आणि श्री सम्मेद शिखरजी या पवित्र भूमीतून मोक्ष प्राप्त केला, अशा या पवित्र भूमीची विटंबना करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय चुकीचा आहे. संपूर्ण देशभरातील जैन समाजाच्या भावना या निर्णयामुळे दुखावले गेल्या आहेत. राज्य सरकारने तो निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे प्रीतम शेठ शहा यांनी सांगितले.जैन समाजाच्या भावना जाणून घेतल्या आहेत, आम्ही त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पोहोचवू, अशी ग्वाही प्रांताधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार अमोल कदम यांनी दिली.
Comments
Post a Comment