सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मानपत्र सोहळ्यात होणार गौरव.

सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती  संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मानपत्र सोहळ्यात होणार गौरव. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

भटक्या विमुक्त जमाती संघटनेला व चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. अशा कार्यकर्त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा येथे दुपारी दोन वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत" कृतज्ञता सन्मानपत्र " सोहळा संपन्न करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटना संयोजन समिती सदस्य, व राज्य सरचिटणीस मा. रामभाऊ जाधव व मा.नारायण जावलीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या माध्यमातून या पन्नास वर्षांमध्ये या जमातीच्या विविध मान्यवरांनी तन-मन-धन या उदात्त हेतूने समाजासाठी कार्य केले आज त्याच पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार व्हावा तसेच यथोचित गौरव करून "कृतज्ञता सन्मानपत्र " वितरित करण्यात येणार आहे तरी स्वतः व कुटुंबासह उपस्थित राहून सन्मानपत्र स्वीकारावे अशी विनंती करण्यात येत असून या कार्यक्रमाच्या उद्घाटनास राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष मा. आ.जयंतराव पाटील, हे उपस्थित राहणार असून महाराष्ट्र भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने साहेब या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. खासदार श्रीनिवास पाटील साहेब   माजी पालकमंत्री मा.आ. बाळासाहेब पाटील, मा. आ. शशिकांत शिंदे, मा. आ. मकरंद आबा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र महिला मा. प्रा. कविता म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री सुनील माने , प्रदेश अध्यक्ष भटक्या विमुक्त जमाती राष्ट्रवादी काँग्रेस सेल मा. हिरालाल राठोड हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रक राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष मा. प्रा. अशोक जाधव व सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटना अध्यक्ष मा.रवी गायकवाड हे असून संघटनेचे विविध पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित राहून सहकार्य करणार असल्याचे संयोजन समितीचे सदस्य राज्य सरचिटणीस मा. रामभाऊ जाधव  व राज्य सरचिटणीस नारायण जावळीकर यांनी केले असून या कार्यक्रमास कृतज्ञता सन्मानपत्र सत्कारमूर्तींनी स्वतः व कुटुंबीयांसह उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.