कृषी प्रदर्शनात येस ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ - संस्थापक संजय भगत.
कृषी प्रदर्शनात येस ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ - संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सेवागिरी महाराज राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात येस ग्रुप ऑफ कंपनीज जाखणगाव यांच्या करार शेती पॅटर्नचा मोठा बोलबाला असून हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे असे येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी सांगितले जाखणगाव येथील येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनीच्या करार शेती पॅटर्न बरोबरच येस ग्रुपच्या बियाण्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. सेंद्रिय उत्पादने गहू, ज्वारी , कडधान्यांना विशेषतः शहरी भागातील लोकांची पसंती मिळत आहे कमी केमिकल विषमुक्त अन्नधान्य पिकवण्यास येस ग्रुपचे प्राधान्य असून भविष्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक प्राप्तीचा मार्ग मिळेल व पौष्टिक,कमी केमिकल युक्त अन्नधान्य लोकांना पुरवण्याचा मानस येस ग्रुपचा असल्याचे संजय भगत यांनी मत व्यक्त केलेतर कंपनी स्टॉलला माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे सर ,प्राध्यापक सुधाकर फडतरे ,प्राध्यापक दौंड सर ,अभिजीत विधाते बागायतदार व शेतकरी यांनी भेट दिली आहे.
रास्त पेक्षा जास्त दराने शेतमाल खरेदीमुळे येसफ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनीचा शेतकऱ्यांना मोठा आधार वाटत असून भविष्यात ज्यादा दर देण्याचा कंपनीचा उद्देश असल्यामुळे आम्ही यस ग्रुपची जोडलेलो गेल्याचा आम्हाला अभिमान आहे असे मत बागायतदार शेतकरी अभिजीत विधाते (मालगाव ) यांनी सातारा 24 तास न्यूजची बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment