कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास द्याल तर याद राखा : अध्यक्ष जयवंत पवार.
कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास द्याल तर याद राखा : अध्यक्ष जयवंत पवार.
कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.
कोरेगाव येथील शिंदे मंगल कार्यालयात राजवंश आठवडा बाजार संघटनेची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणारे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची या मिटींगला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गेले कित्येक वर्ष झाले आठवडा बाजार करणारे नागरिक संघटित होत नसल्याने अध्यक्ष जयवंत पवार व काही व्यापारी बांधवांनी या संघटनेची कोरेगाव तालुक्यात बांधणी केली दस्तूर खुद्द श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजवंश आठवडा बाजार संघटनेची स्थापना करण्यात आली गेले तीन वर्ष ही संघटना मोठ्या प्रमाणावर गोरगरीब दिन दलित, कष्टकरी, आठवडा बाजार करणारे व्यापाऱ्यांसाठी काम करीत असून सोमवारी दुपारी १ वाजता कोरेगाव येथील शिंदे मंगल कार्यालय येथे राजवंश बाजार संघटनेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेचे अध्यक्ष व कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक जयवंत पवार यांनी आपल्या व्यापारी बांधवांना गावोगावी आठवडा बाजार करण्यासाठी जावे लागते यावेळी तेथीलच काही गावगुंड जाणून बुजून या कष्टकरी बांधवांना नाहक त्रास देत असतात परंतु या मासिक मीटिंगमध्ये अध्यक्ष व नगरसेवक जयवंत पवार यांनी या गावगुंडांना चांगलाच असा सज्जड दम दिला आहे ते म्हणाले आठवडा बाजार करणारा हा गोरगरीब कष्टकरी बांधव असतो यांना जर कोण त्रास देत असला तर त्याचा चांगल्या रीतीने संघटना व आम्ही समाचार घेवू अशाप्रकारे अध्यक्ष जयवंत पवार यांनी सुनावले.यावेळी मोठ्या प्रमाणावर व्यापारी बांधव उपस्थित होते या मासिक मीटिंग वेळी व्यापाऱ्यांचे हिताचे निर्णयही एकमताने घेण्यात आले.
Comments
Post a Comment