जागतिक अपंग दिनानिमित्त विविध सामाजिक संस्थाकडून दिव्यांग लोकांना मदतीचा हात.
मलवडी फलटण प्रतिनिधी. शकील सययद.
3 डिसेंबर, 2022 स्थळ - दिवा, नवी मुंबई आर पी जी फाउंडेशन, आरपीजी लाइफ सायन्सेस, आरिन फाऊंडेशन, अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था व मलसन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 दिव्यांग लोकांना बॅग वाटप, वैयक्तिक स्वच्छता व विविध सरकारी योजनांचे फॉर्म भरून सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा करणे या विषयावरती जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रम राबवण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्त आरपीजी फाउंडेशनचे मा. साजिद सय्यद, आरिन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. रितेश मिसाळ, अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था याचे अध्यक्ष मा. सुरेश दुधाने, मलसन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष मा. प्रिया वाघमारे, आरपीजी लाइफ सायन्सेस कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर मंगेश पाटील, संजय लाड व एक्झिक्यूटिव्ह- चंद्रकांत कदम, सूर्यकांत महाडकर, विनोद विठ्ठल, अक्षय जाधव, शुभम शेडगे, ऋतुराज निकम या मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री साजिद सय्यद यांनी दिव्यांग लोकांचा शैक्षणिक, आरोग्य, व्यवसाय आणि व्यवसायिक कौशल्य या विषयावरती समाजामध्ये जनजागृती केली. त्याचबरोबर आर पी जी फाउंडेशन मध्ये असणाऱ्या डाटा एन्ट्री, ग्राफिक डिझायनिंग, जनरल ड्युटी असिस्टंस (जी. डी. ए) या तीन महिन्याच्या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती देऊन त्या कोर्समध्ये 80-90 टक्के कॅंडिडेट्सला जॉब भेटतो याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करताना श्री सुरेश दुधाने यांनी कोपरखैरणे येथील सेक्टर 17 मध्ये दिव्यांग लोकांसाठी शाळा काढण्याचा संकल्प लोकांसमोर जाहीर केला.
Comments
Post a Comment