खटाव, माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटेकरी करण्याचे पाप कोरेगावच्या आमदारांनी करू नये - युवा नेते राम जाधव.
खटाव, माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटेकरी करण्याचे पाप कोरेगावच्या आमदारांनी करू नये - युवा नेते राम जाधव.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
कोरेगाव तालुका हा बागायती आहे.अगोदरचं तेथे कॕनाॕल पोहचलेला आहे.त्यात फाटे फोडू नका भाडळे खोऱ्याला जिहेकटापूर मधुन पाणी देणेसाठी ,आमदार महेश शिंदे वल्गना करीत आहेत, जिहेकटापूर ही योजना फक्त खटाव-माण या कायम दुष्काळी तालुक्यासाठी आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी खास प्रयत्न करुन दुष्काळी तालुक्यांचा बॕकलाॕग भरुण काढला आहे. या खटाव माण दुष्काळी तालुक्यासाठी उरमोडी धरण बांधतांना सातारा तालुक्यातील कृष्णाकाटाच्या त्या वेळच्या पुढाऱ्यांनी खुप विरोध केला होता.पण मनोहर जोशी साहेबांसारखे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला भेटले म्हणून या दुष्काळी तालुक्यातील तहानलेली जनता तहान भागली,आणि भुमि हिरवा शालू नेसू शकली, तरी खटाव -माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटकरी करण्याचे पाप आमदार महेश शिंदेनी करु नये !चार मते कोरेगाव तालुक्यातील स्वतःला मिळवणेसाठी कोरेगाव तालुक्यातील ह्या गावाला पाणी देतोआणि त्या गावाला पाणी देतो, म्हणून खटाव -माणचं वाळवंट करु नका.या तालुक्यात लोकहितासाठी काम करणारे आमदार कधी भेटलेच नाहीत एक तर धनदांडगे किंवा स्वतःच्या मतापुरते राजकारण करणारे स्वार्थी लोकप्रतिनीधी भेटले,म्हणून 50/60 वर्षे खटाव माणचा पाणी प्रश्न सुटला नव्हता ही वस्तुस्तिथी आहे.तरी जिहेकटापूरच्या खटाव -माणच्या हक्काच्या पाण्यात वाटेकरी तयार करु नका! तुम्हच्या मताच्या स्वार्थासाठी,नाही तर खटाव -माणची जनता तुम्हचे मताचे दुकान बंद केले शिवाय रहाणार नाही,कोरेगांव तालुक्यातील जे कॕनाॕल सांगली जिल्ह्यात जातात त्याचे पाणी अडवा आणि ते पाणी कोरेगांव तालुक्यात कुठे द्यायचे तिकडे द्या! पण खटाव -माणच्या जनतेचा तळतळाट -शाप घेऊ नका .उरमोडी आणि जिहेकटापूर योजना ही फक्त खटाव-माण तालुक्यांच्यासाठी आहे या योजनेतुन इतर कुणाला पाणी देता येणार नाही असे माजी मुख्यमंत्री मा.मनोहर जोशी सरांनी या योजनांचे भूमिपूजन करतानाच शासनाची भुमिका स्पष्ट केली होती.ह्या योजनाच मुळात कायमदुष्काळी तालुक्यासाठी केल्या होत्या,त्यामुळे स्वतःचे नसलेले बाहु फुगवुन/ बेडक्या फुगवुन खटाव -माणच्या योजनेतील पाण्याला फाटे फोडू नका ;आणि नवे वाटेकरी तयार करु नका,नाही तर आपले विरोधात खटाव -माणची जनता रस्त्यावर उतरेल .असा इशारा पुसेगावचे युवा नेते
राम जाधव -राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी खटाव तालुका यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
Comments
Post a Comment