पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस जप्त मोटर सायकलचा जाहीर लिलाव.

पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस जप्त मोटर सायकलचा जाहीर  लिलाव.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

पुसेगाव ता.खटाव येथील पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस असणारे वाहनांचा दिनांक 15 .12. 2022 रोजी लिलाव करण्यात येणार आहे तत्पूर्वी वाहनाचे लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून  लिलाव घेणाऱ्या व्यक्तींनी 14. 12. 2022 रोजी पर्यंत दुचाकी वाहन करतात पाच हजार रुपये याप्रमाणे डिपॉझिट रक्कम पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल, व कोणाचे वाहन चोरीस गेले असल्यास त्यांनी वाहनांचे कागदपत्रे पुराव्यासह पोलीस स्टेशनला हजर राहून आपले वाहन त्या वाहनांमध्ये आहे. का याबाबत पाहणी करावी व ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे नंतर येणाऱ्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही लिलावाबाबत प्रक्रियेत लिलाव करण्यात येणारी बेवारस 33  मोटरसायकली असून सदर वाहनांचे लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून त्या व्यक्तींनी वाहने लिलावाचे तारखेपर्यंत सकाळी दहा वा. ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाहणी करता येईल व वाहनांची यादी पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर लावली आहे
 तरी लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून त्या व्यक्तींनी दिनांक 15. 12 .2022 रोजी सकाळी दहा वाजता पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये लिलावात बोली लावून सदर वाहनांचे लिलाव करण्यासाठी उपस्थित राहावे डिपॉझिट रक्कम जमा केल्याशिवाय लिलावात भाग घेता येणार नाही व बोली लावून,  वाहनांची बोलीची पूर्ण रक्कम जमा केली पाहिजे, बोली लावून वाहनांची पूर्ण रक्कम न भरल्यास डिपॉझिट ची रक्कम सरकार जमा करण्यात येईल ती रक्कम संबंधीना परत मागता येणार नाही असे पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी सांगितलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.