अॕड सुश्मिता धुमाळ यांची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड.
कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला
करंजखोप तालुका कोरेगाव येथील ॲड सुश्मिता भालेराव धुमाळ या युवतीने फोरेवर मिस मिसेज टीन 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली. १७,१८ व १९ डिसेंबर रोजी जयपुर,राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये या युवतीने विजेती होऊन "Forever Miss India 2022" हा किताब स्वतःच्या नावे केला. ग्रामीण भागातून आलेल्या सुंदरीने Forever Miss India या स्पर्धेत आपले नावलौकिक मिळवल्याने त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे .जयपुर राजस्थान येथे या संदर्भात देशात सर्वात मोठी असलेली इंटर नॅशनल लेवल ब्युटी पॕजेंट फॉरएवर मिस इंडिया सीजन 2 चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशभरातून अनेक सुंदर युवतीसह महाराष्ट्रातूनही अनेक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता या वेळी ॲड.सुश्मिता धुमाळ यांनी आकर्षक कपडे परिधान करून रँप वॉकद्वारे व आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये देखील त्या अव्वल स्थानी ठरल्या. सुरूवातीला सातारा जिल्ह्यातून निवड होऊन Forever Miss Satara व त्यानंतर Forever Miss Maharashtra तसेच आता Miss India या किताबावर वर देखील आपले नाव कोरले . अष्टपैलू असणारी ही सातारची सुंदरी व्यवसायाने वकिल आहे. त्याचसोबत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे Ph.D देखील करत आहे.दरम्यान कथ्थक व अभिनयाची आवड असलेल्या या सुंदरीने यावेळी टॅलेंट राऊंडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय व भारत कि बेटी या गीतावर कथ्थक नृत्याविष्कार सादर केला याप्रसंगी ॲड.सुश्मिता धुमाळ यांना क्राऊन ,ट्रॉफी सर्टिफिकेट सैश व धनादेश देऊन आयोजकांकडून गौरविण्यात आले . यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या १३८ देशांतील स्पर्धकांमध्ये त्या पात्र ठरल्या असून भारताचे नेतृत्व करणार आहे.
Comments
Post a Comment