कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी ग्रामपंचायत बिनविरोध निवड.

कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी ग्रामपंचायत बिनविरोध निवड.

कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला. 

कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथील ग्रामपंचायत सन 2022 ते 27 या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. खेड या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये भैरवनाथ मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत ठराव करण्यात आला त्यानुसार खेड ग्रामपंचायत सरपंच पदी सौ सुनीता सुरेश घनवट यांची निवड करण्यात आली. तसेच उपसरपंच राजेंद्र कुमार कदम  व सदस्यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली सर्व ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल एकमेकांचे पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला .आज गावामध्ये सरपंच उपसरपंच व सदस्य यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .तसेच भैरवनाथ  मंदिराच्या कामासाठी सर्व ग्रामस्थ एकवटले. तसेच आज दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी कोरेगाव येथील सर्किट हाऊस मध्ये दुपारी एक वाजता आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आमदार महेश शिंदे यांचा आशीर्वाद घेतला आमदार महेश शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.