विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण संस्था कटिबद्ध - डॉ. सुरेशराव जाधव.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
शाळेच्या संरक्षण भूमीचे भिंतीचे भूमिपूजन डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलताना म्हणाले सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या माध्यमातून रणसिंगवाडी ता . खटाव येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ,भविष्यात देखील नेहमीच या विद्यार्थ्यांच्या व हायस्कूलच्या प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध राहील असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले .श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित ,श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे रणसिंगवाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री अजित रणसिंग यांच्या प्रयत्नातून ,फ्लाय हाय चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सीएसआर फंडातून शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी अजित रणसिंग यांनी दिलेल्या देणगी बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या भौतिक सोयी सुविधा व अपेक्षित गोष्टींवर चर्चा यावेळी करण्यात आली . याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव ,सचिव मोहनराव जाधव, रणसिंगवाडीचे सरपंच सुखदेव रणसिंग ,पोलीस पाटील सुनील रणसिंग, शाळा व्यवस्थापनचे श्री तुळशीराम शिंदे श्री अजित रणसिंग, श्री अशोक फडतरे, श्री दिलीप फडतरे, श्री बापूराव बागल, श्री शिवाजी यादव, सौ स्नेहल मदने , कु समीरा इनामदार यावेळी उपस्थित होते मुख्याध्यापिका सौ माया पाटील यांनी प्रास्ताविक केले . सचिन गिरीगोसावी यांनी आभार मानले . या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ , विद्यार्थी उपस्थित होते .
Comments
Post a Comment