भक्तांचा पाठीराखा पुस्तकातून सेवागिरी महाराजांच्या विचारांचा प्रसार - मठाधिपती सुंदरगिरी महाराज.
पुसेगाव: प्रतिनिधी पंकज कदम.
सद्गुरु श्री सेवागिरी महाराज अनेकांचे प्रेरणास्थान आहे. अनेक भक्तांच्या सुखदुःखामध्ये सेवागिरी महाराज आपले आशीर्वाद देत असतात. अशा भक्तांच्या अनुभवाची आपल्या शब्दातून बांधणी करत श्री सेवागिरी महाराजांचे विचार भक्तांचा पाठीराखा या पुस्तकात विशाल सुर्यवंशी यांनी अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. भक्तांचा पाठीराखा हे पुस्तक समस्त भक्तांसाठी सेवागिरी महाराजांचा प्रसाद आहे असे मत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मताधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले. लेखक विशाल सुर्यवंशी लिखित "भक्तांचा पाठीराखा" या पुस्तकाची पहिली प्रत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक विशाल सूर्यवंशी, चेअरमन बाळासाहेब जाधव, वेद अभ्यासक शंकर निकम सर, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीरशेठ जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हो यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले महाराजांच्या साक्षात्काराची अनेकांना प्रचिती आली आहे. अनेकांचे दुःख नाहीसे करण्याची ताकद महाराजांच्या नावांमध्ये आहे. आज लाखो भाविक महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पुसेगावला येत असतात. याच भाविकांचे अनुभव विशाल सुर्यवंशी यांनी अत्यंत सोप्या भाषेत शब्दबद्ध करत "भक्तांचा पाठीराखा" या पुस्तकाची केलेली निर्मिती कौतुकास्पद आहे. सेवागिरी महाराजांच्या भक्तांनी या पुस्तकाला सकारात्मक प्रतिसाद देत सेवागिरी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे काम करावे असे आवाहन मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी केले.यावेळी आप्पासाहेब जाधव, उज्वल खलाटे, विक्रम गोसावी, अंकुशराव पाटील, भरत मुळे, रोहित कांबळे,विशाल जाधव, विनोद जाधव, विठ्ठल तोडकर,किरण मगर, पत्रकार पंकज कदम, यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते.
Comments
Post a Comment