माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात.
फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.
फलटण भा.ज.पा चे जिल्हा अध्यक्ष व माण-खटाव चे आ. जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.पहाटे ३:१५ च्या दरम्यान, पुणे - पंढरपूर रोड वरील फलटण शहर स्मशानभूमी जवळील बाणगंगा नदीच्या पुलाचा कठडा तोडून टोयोटा कंपनीची काळया रंगाची फॉर्च्यूनर गाडी अंदाजे ५० फूट खोल नदी पात्रता कोसळली. सदर गाडीत आमदार जयकुमार गोरे, वाहन चालक -कैलास दडस , अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन बनसोडे, स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे हे पुण्याहून दहिवडी करिता प्रवास करत होते.
प्रवासादरम्यान गाडीचा अपघात झाला सदर अपघातात वाहन चालक दडस व स्वीय सहाय्यक साळुंखे यांना गंभीर दुखापत झाली असून बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आलेले आहे. अंगरक्षक बनसोडे यांच्यावर फलटण येथील निकोप हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच आमदार जयकुमार गोरे यांना पुणे येथील खाजगी रुग्णालय रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी नेहेण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे चौघांचीही प्रकृती स्थिर आहे.
Comments
Post a Comment