भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
मलवडी फलटण प्रतिनिधी. शकील सय्यद.
आज दिनांक 06/12/2022 रोजी जि.प. प्राथमिक शाळा मलवडी ता. फलटण या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले मनोगत वेक्त केले.या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष शकील सय्यद यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ,त्याच प्रमाणे संविधान या बद्दल चांगल्याप्रकारे माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले.
तसेच या ठिकाणी मलवडी गावचे सरपंच बाजीराव तरडे आणि ग्रामपंचायत सदस्य आप्पा रुपनवर कुंडलिक बिचुकले शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष शकील सय्यद, स्वामी सर गडकरी सर गाढवे सर श्री बोबडे सर श्री भंडलकर सर मुख्याध्यापक श्री कोळेकर सर श्री माने सर व ग्रामस्थ मलवडी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बोबडे सर यांनी केले व आभार माने सर यांनी मानले .
Comments
Post a Comment