श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव येथे भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन चेअरमन बाळासाहेब जाधव.

श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव येथे  भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन  
चेअरमन बाळासाहेब जाधव.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मलीन तपोनिधी सिद्धहस्त श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीस 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त  श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 13 ते 15 भजन स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव यांनी केले आहे. मंगळवार दिनांक 13 रोजी बालगट दिनांक 14 रोजी पुरुष गट व दिनांक 15 रोजी महिला गट असे स्पर्धेचे आयोजन केले असून बालगट, पुरुष गट, महिला गट प्रत्येक गटास अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक 17 हजार रुपये , 15 हजार रुपये  11 हजार व चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये देण्यात येणार आहे. ही बक्षिसे पुसेगाव किराणामाल व्यावसायिक असोसिएशन पुसेगाव यांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात आठ ते दहा जणांचा समावेश असावा, स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येतील, प्रथम फेरीसाठी वीस मिनिटे वेळ असेल, दोन अभंग व एक गवळण गायली पाहिजे, सादरीकरणामध्ये भजन मंडळातील कमीत कमी तीन लोकांनी गायन करणे गरजेचे आहे प्रथम फेरीतून गुनानुक्रमे दहा संघाची निवड केली जाईल, दुसऱ्या फेरीमध्ये पंधरा मिनिटे वेळ दिला जाईल, त्यात एक अभंग व गवळण गायली जावी, प्रथम व द्वितीय फेरीतील रचना वेगवेगळ्या असाव्यात यातून अंतिम संघाची निवड केली जाईल, परीक्षकाचा निर्णय अंतिम राहील,स्पर्धकांची भोजन व्यवस्था केली जाईल, तीनही गटाच्या दोन्ही फेऱ्या त्या दिवशी घेण्यात येतील, व्यावसायिक व रेडिओ स्टार यांना भाग घेता येणार नाही, दिनांक अकरा व बारा अखेर संघाची नोंदणी केली जाईल त्यानंतर येणाऱ्या संघाचा विचार केला जाणार नाही. भजन संघाचे नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 9142260347 संपर्क साधण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.