प्रभातचे व्यवस्थापक जयंत काटे यांचे निधन.

प्रभातचे व्यवस्थापक जयंत काटे यांचे निधन.

 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

दैनिक प्रभातच्या सातारा आव्रुत्तीचे ब्युरो चीफ व्यवस्थापक व वृत्तपत्र वितरण क्षेत्रात आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे जयंत राजाराम काटे (वय 57) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता ,मुलगा आदित्य, विवाहित कन्या रमा, जावई, थोरले बंधू अविनाश काटे व धाकटे बंधू श्रीकांत काटे असा परिवार आहे.गोपाळवाडी (ता. दौंड, जि. पुणे) हे मूळ गाव असणारे जयंत काटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा दबदबा  निर्माण केला होता. तीस वर्षांपूर्वी सातारच्या दै. ऐक्यमधून त्यांनी वितरण विभागातून आपल्या करिअरला सुरुवात केली. केसरी लोकमत, प्रभात तसेच विविध दैनिकांमध्ये त्यांनी  जबाबदार पदांवर त्यांनी अत्यंत सचोटीने काम केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांना संधी देऊन पुढे आणण्याचे काम जयंत काटे यांनी हिरीरीने केले. आपला हसतमुख चेहरा आणि मनमिळाऊ स्वभावाने समोरच्याला आपलं करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. दैनिक प्रभातची सातारा आवृत्ती स्थानिक पातळीवर रुजवण्यात काटे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच साताऱ्याच्या सामाजिक राजकीय आणि वृत्तपत्र क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली. जयंत काटे यांचा मित्रपरिवार प्रचंड मोठा होता. त्यांच्यावर मंगळवार दि. ६ डिसेंबर रोजी येथील कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.