स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये 100 रक्तदात्यांनी केले रक्तदान. 

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
  
  भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य  साधून पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांनी पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये सोमवार दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी रक्तदान शिबिरामध्ये 100 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.सोमनाथ काटकर यांच्या स्टाफने सहकार्य केले असे पुसेगाव पोलीस स्टेशनचे ए.पी.आय संदीप शितोळे साहेब यांनी सांगितले. या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व हेल्मेट भेट म्हणून देण्यात  आले.
यावेळी सातारा 24 तास न्यूज ची बोलताना एपीआय संदीप शितोळे म्हणाले लोकांनी स्वयंस्पुर्तीने रक्तदान केले रक्तदान एक सामाजिक जबाबदारी आहे ही जबाबदारी ओळखून मी ही बऱ्याच वेळा रक्तदानाच्या कार्यक्रमात भाग घेतला आहे व आजही रक्तदान केली असल्याचे त्यांनी सांगितले व यामध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी ,पोलीस पाटील, विविध पक्षातील युवा नेते व तरुण युवक यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव पोलीस स्टेशन तर्फे रक्तदान कार्यक्रमाचे आवाहन केले होते.  व रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला सातारा 24 तास न्यूज चैनलच्या वतीने या रक्तदानात शिबिरात युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले  होते. त्या बातमीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे एपीआय संदीप शितोळे साहेब यांनी  बोलताना सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.