बायोस्टॅण्ड इंडिया लिमिटेड तर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे वितरण.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
कोरेगाव तालुक्यातील तडवळे सं कोरेगांव येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री सिद्धेश्वर हायस्कुल, तडवळे येथे बायोस्टॅण्ड इंडिया लिमिटेड, या शेतकी औषध कंपनीने आपल्या सीएसआर फंडातून ३६व्या बाये झाइम दिनानिमित्त होतकरू विद्यार्थ्यांसाठी बायोझाईम प्रगती शिष्यवृती योजना राबवली. होतकरु विदयार्थ्यांसाठी 25 हजार रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात आली. कृषी कांचन कृषी सेवा केंद्राचे संचालक श्री. नितिनशेठ भोसले सो यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मा श्रीमंतभाऊ झांजुर्णे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बायोस्टॅण्ड कंपनीचे संजय गायकवाड साहेब, विशाल पवार व विजय जाधव, यांच्या हस्ते विदयार्थीना गौरवपत्र वितरीत करण्यात आले.
कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातून काही हिस्सा कंपनी शेतकर्यांच्या हिताच्या योजनांसाठी खर्च करत असते. त्या अंतर्गत शैक्षणिक प्रकल्पातून दहावीत शिकत असलेल्या विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्यासाठी मदत करत असते. कंपनी शेतीविषयक शेतीशाळा सारखे प्रकल्प राबवित असल्याचे श्री गायवाड यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य,शालेय समितीचे अध्यक्ष, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, कर्मचारी,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment