बालाजी कन्स्ट्रक्शन सातारा यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त मदतीचा हात.

बालाजी कन्स्ट्रक्शन सातारा यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्त मदतीचा हात.

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


काल रक्षाबंधन निमित्त मी, श्री बालाजी कन्स्ट्रक्शन सातारा या माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने जपली माणुसकी, दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या ल्हासूर्णे  येथील फार्म हाऊस वरील निवासस्थानी दोन मुलं माझी भेट घेण्याकरता आली होती. त्यांनी  माझ्या आईला कॅन्सर झाला असून 11 तारखेला तिचं ऑपरेशन आहे. दादा आपण आम्हाला मदत करावी अशी विनंती केली,,,यापूर्वीही मी त्यांना मदत केली होती. या कुटुंबाच दुर्दैव असं की, वडील मुंबईमध्ये नोकरीस होते. घरच् सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक वडिलांना अर्धांग वायू झाला व ते घरी अंथरूण पकडून राहिले, ज्यावर मुंबईमध्ये उपचार चालू होते पण आर्थिक विनिमयाचे कोणतेही साधन नसल्याने उपचार अर्धवट सोडून त्यांना गावी यावं लागलं, आणि दुर्दैव असं आईच्या पोटात दुखतय म्हणून काही टेस्ट केल्या असता पोटामध्ये गाठ आहे असे निष्पन्न झाले.ती कॅन्सर ची गाठ काढण्यासाठी ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरने सांगितले व त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडील अंथरुणावर खिळून,तर आईला कॅन्सर , दोघांचे हॉस्पिटलचे खर्च करायचे कसे? आईला ऍडमिट केलं तरी शासकीय योजनेतून फ्री मध्ये ऑपरेशन होईल पण मेडिकल साठी लागणारे पैसे ते तरी कुठे आहेत आमच्याकडे? त्यामुळे ते कुटुंब प्रचंड चिंतेत होतं,मी त्या मुलांना म्हटलं तुम्ही घरी जावा मी आई-बाबांची येऊन भेट घेतो. थोड्यावेळाने मी त्यांच्या घरी पोहोचलो बाबा अंथरुणावरती झोपले होते, आई त्यांच्या शेजारी बसली होती मीही घरात जाऊन बाबांच्या शेजारी बसलो, तब्येतीची विचारपूस केली मग त्या ताईशी बोलायला मी सुरुवात केली. त्यांनी सर्व दुःखाचा पाढा माझ्यासमोर वाचला मला शब्दच फुटेनात,कारण आधीच्या टेस्ट करण्यासाठीच त्यांना खूप विलंब झाला. आता ऑपरेशन झालं तरी औषधांसाठी  कुठे पैसे आहेत? मी म्हटलं ताई आपण ऍडमिट व्हा औषधांसाठी लागणारा सर्व खर्च मी करेन. फक्त तुम्ही खचून जाऊ नका. ऑपरेशन चांगलं होईल, पुन्हा आपण घरी येऊन पूर्वीसारखंच आयुष्य जगाल काळजी करू नका. काल त्यांना ऍडमिट केलं होतं आधी जाऊन त्यांची भेट घेतली व नंतर हॉस्पिटल मधील माझे जिवलग मित्र आदरणीय श्री उदय जी देशमुख साहेब यांची भेट घेतली. खूप दिवसांनी आम्ही भेटलो होतो. त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व नंतर मी त्यांना हा विषय सांगितला. त्यांनी लगेच संबंधित व्यक्तीस फोन करून त्या पेशंटची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांना होईल एवढी मदत आपणास करावयाची आहे यांच्याकडे विशेष लक्ष द्या असे सांगितले. तो फोन ऐकताना अक्षरश माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण आज उदयजी देशमुख यांना भावनिक होताना पाहिलं. खरंतर त्यांची आणि माझी भेट म्हणजे ओंको कॅन्सर हॉस्पिटलचे बांधकाम करण्याचं भाग्य माझ्या कंपनीला लाभले होते.अतिशय अल्पावधीत याचं बांधकाम माझ्या कंपनीने केलं होतं आणि म्हणूनच उदय जी देशमुख सरांची आणि माझी भेट झाली नेहमीच ते मला कॅन्सर पेशंट यांना मदत करण्याचं सहकार्य करत असतात  त्याबद्दल खरंतर मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. मित्रांनो खरंतर हे लिखाण करण्यामागचं कारण एवढेच आहे मीही तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील माणूस आहे मी नेहमीच आर्थिक दुर्बल कुटुंबांना मदत करत असतो. शैक्षणिक असो अथवा आरोग्य विषयी पण मी एकटा तरी काय करणार ?व्यवसायातून कमावलेल्या पैशातून कौटुंबिक गरजा भागवल्यानंतर उरलेल्या पैशातून समाजसेवा करायची हा ध्यास मनी बाळगून मी प्रयत्न करतोय. अलीकडं मदतीसाठी फोन येण्याचे प्रमाण वाढलेलं आहे,त्यातून फूल नाही फुलाची पाकळी मी मदत करत असतो. आपणा सर्वांना नम्र विनंती आहे अशा पद्धतीच्या पेशंटला आपणही मदत करू शकता. थोड्या थोड्या प्रमाणात त्याकरिता मी डायरेक्ट त्या पेशंटच्या घरच्यांचा नंबर देईन.आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांना थोडीफार मदत करू शकता व आपण या समाजसेवेचा हिस्सा बनवू शकता. अजूनही एका पेशंटला मदत करणे बाकी आहे तो पुण्यामध्ये ऍडमिट आहे. जर कोणास मदत करायची असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.मी त्या कुटुंबाचे फोन नंबर देईन आज त्या ताईचं ऑपरेशन आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ती लवकर बरी होईल व आपल्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा रमून जाईल.
आपलाच, श्री रमेश अनिल उबाळे, "श्री बालाजी कन्स्ट्रक्शन ,सातारा"...(9850648502/9422402605)

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.