नेर येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी महिलेस चार वर्षाची कैद.

नेर येथील अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी महिलेस चार वर्षाची कैद.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी नेर तालुका खटाव येथील सविता निलेश काशीद वय 34 यामध्येच वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्ष साधी कैद व 1000 रुपयाचा दंड अशी शिक्षा  ठोठवली
 या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी श्रीमती सविता काशीद हिने फिर्यादीचे राहते घरासमोरील माने यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील खोलीत पीडित अल्पवयीन मुलीचा  जिल्हा परिषद शाळे समोरून फूस लावून नेले होते टेरेस वरील खोलीत नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला होता तसेच मृतदेह विहिरीत टाकून पुरावा नष्ट केला होता याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास केला उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंंद्रे सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या सहकार्याने गायकवाड यांनी साक्षीदाराचे जबाब नोंदवून वैद्यकीय पुराव्यासह वडूज सत्र न्यायालयात दोषारोप  दाखल केले सरकारी वकील श्रीमती अनुराधा निंबाळकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदाराचे जाबजबाब नोंदवून फिर्यादी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली कागदपत्रे पुरावा वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरून आरोपी सविता निलेश काशीद हल्ली नेर, मुळगाव मालगाव. तालुका जिल्हा सातारा, हीच  न्यायाधीश पी. वाय. काळे यांनी वरील शिक्षा ठेवली या कामी पुसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार  दडस मॅडम, अक्षय शिंदे ,सागर सजगणे, घाडगे मॅडम, यांचे न्यायालयात सहकार्य लाभले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.