सरपंच सुखदेव रणसिंग यांच्या आवाहानाला दानशूर ग्रामस्थांची मिळाली साथ.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
रणसिंगवाडी. ता. खटाव येथील जिल्हा प्राथमिक शाळा व भैरवनाथ हायस्कूल या विद्यार्थ्यांना आर्यन फाउंडेशन' व मनोज घाडगे यांच्या संयुक्त उपक्रमाने येथील शंभर शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .तर 'भैरवनाथ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ' रणसिंगवाडी या मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले. रणसिंगवाडी गावचे सरपंच सुखदेव रणसिंग यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केले की गावातील सर्व मंडळांनी, ग्रामस्थांनी, दानशूर व्यक्तींनी, शिक्षण प्रेमींनी गावातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी , गुणवत्ता वाढीसाठी मदत करावी . याप्रसंगी आरीन फाउंडेशनचे सहकारी ,श्री मनोज घाडगे त्यांचे सहकारी ,भैरवनाथ कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी, सरपंच सुखदेव रणसिंग, पोलीस पाटील सुनील रणसिंग ,आदरणीय सयाजीराव जाधव ,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक फडतरे सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुळशीराम शिंदे व बागल, श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडीच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम व त्यांचे सहकारी जाधव मॅडम, गिरी गोसावी सर, गायकवाड सर उपस्थित होते.
सरपंच सुखदेव रणसिंग यांनी केलेल्या आवाहनाला दिलेल्या साथ, अशा सर्व दानशूर व्यक्तींचं व ग्रामस्थांचं आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment