कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
कोरेगाव नगरपंचायातीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे
नगरपंचायत कोरेगांव यांना निवेतन देताना स्वर्गीय आप्पा पाटील नगर कोरेगाव, येथील सार्वजनिक शौचालये,गटारे दुरस्ती व स्वच्छता करण्याकरीता स्वर्गीय आप्पा पाटील नगर कोरेगावच्या वतीने विंनती अर्ज करून गेल्या कित्येक वर्षांपासून सन_ २०१५ ते २०२२ या साला पासून येथील लोकवस्ती मध्ये सार्वजनिक शौचालयचे संडास चे भांडे, दरवाजे कित्येक वर्षांपासून तुटले आहे,यामुळे संडास मद्ये कधी उंदीर तर कधी साप निघत आहे, यामुळे समाजा मधील महिला वर्गाला व छोट्या मुलांना शौचालयास जाणे धोक्याचे ठरत आहे. व महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्ती मद्ये गटारची अवस्था खूप बेकार आहे, व सुभाष नगर, सरकारी दवाखाना या ठिकाना वरील गटराची घान आमच्या वस्तीतल्या गटरामद्ये साठत आहे, व नगरपंचायत मधील कर्मचारी वेळोवेळी गटार साफ करण्यासाठी येत नाही, अश्या काही गोष्टी मुळे आमच्या लोकवस्तीतील लोकांना डेंग्यू व मलेरिया सारख्या आजाराला सामोरे जावं लागत आहे, या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? असा प्रश्न स्वर्गीय आप्पा पाटील नगर कोरेगावच्या वतीने उपस्थीत करण्यात येत आहे तसेच विनंती करून आमच्या मागण्या दोन दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावी,अन्यथा स्वर्गीय आप्पा पाटील नगर यांच्या वतीने मोठ्या प्रमाणत उपोषण करण्यात येईल. स्वच्छतागृह व गटारे तातडीने पूर्ण न केल्यास उपोशनास बसणार नितीन बोताळजी.
Comments
Post a Comment