पुसेगाव येथे श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने महामार्गाच्या अर्धवट अवस्थेतील कामाबाबत आमरण उपोषण सुरू.

पुसेगाव येथे श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने महामार्गाच्या अर्धवट अवस्थेतील कामाबाबत आमरण उपोषण सुरू.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

पुसेगावातून जाणाऱ्या सातारा टेंभुर्णी 548 सी या राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट अवस्थेतील बंद असलेले काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावे, व पुसेगावातील ग्रामस्थांची तसेच पुसेगावातून जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांची,वाहनांची रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात या मागणीसाठी श्री सेवागिरी रयत संघटना पुसेगांव शहर यांचेवतीने आज पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. 
 आज पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये रयत संघटनेच्या वतीने श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब( संतोष) जाधव यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून,  रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव. विश्वस्त सेवागिरी देवस्थान ट्रस्ट गौरव जाधव.सुरेशशेठ जाधव,यांच्या नेतृत्वाखाली तसेच रयत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीमध्ये आज पासून आमरण साखळी उपोषणास प्रारंभ  करण्यात आले. पुसेगांव शहरातून जाणाऱ्या, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गचे बंद असलेले व अर्धवट असलेले काम व पुसेगांव गावठाण हद्दीतील दुतर्फा गटर बांधकाम चालु करण्याच्या मागणीसाठी तसेच या राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने विविध रोडसुविधा उपलब्ध करुन देणेसाठी हे आमरण उपोषण चालू करण्यात आले आहे.या उपोषणाचे मुख्य उपोषणकर्ते श्री संदीपभैय्या जाधव अध्यक्ष श्री सेवागिरी रयत संघटना ,श्री सुरेशशेठ जाधव मा. विश्वस्त श्री सेवागिरी देवस्थान व विद्यमान ग्रा पं सदस्य ,श्री संतोष वाघ विश्वस्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ,श्री गणेश उर्फ अभिजीत जाधव ग्रा पं सदस्य ,श्री बाळासाहेब जाधव मा सरपंच व उपाध्यक्ष खटाव तालुका राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी ,श्री  मधुकर टिळेकर ग्रा पं सदस्य  इतर मुख्य कार्यकर्ते उपस्थित आहेत ,साखळी पद्धतीने इतर कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहेत प्रशासनाने लवकरातलवकर राष्ट्रीय सातारा - टेंभुर्णी -लातुर महामार्गाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा संबंधित प्रश्नास गंभीर परिणामास सामोरे जावे लागेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.