आईच्या स्मरणार्थ भावंडांकडून जिल्हा परिषद शाळेला 51 हजारांची देणगी सावंत परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.

आईच्या स्मरणार्थ भावंडांकडून   जिल्हा परिषद शाळेला   51 हजारांची देणगी 
     सावंत परिवाराने जपली सामाजिक बांधिलकी.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

विसापूर हे सैनिकी परंपरा लाभलेले गाव. येथील प्राथमिक शाळाही जिल्ह्याच्या शैक्षणिक पटलावर अग्रस्थानी आहे. लोकसहभागातून या शाळेचे रूप पालटले आहे. त्यासाठी सुमारे २० लाखा उभे राहिले. त्यात ग्रामस्थ अन् शिक्षणप्रेमींचा हातभार महत्त्वपूर्ण ठरला आहे. शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणातही झेप घेतली आह.  आपली मातृ भूमी वर  असणाऱ्या प्रेमाखातर व दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर (ता. खटाव) येथील सावंत   कुटुंबीयांतर्फे गावातील प्राथमिक शाळेस ५१ हजार रुपयांची देणगी दिली आहे. त्यांच्या या शैक्षणिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. चिरंजीव तुकाराम हे पोलिस दलात, अविनाश हे नौदलात अन् उमेश हे निढळ  येथे मेडिकल  व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत.  यावेळी सावंत कुटुंबीय  सागर साळुंखे,  संदीप सत्रे ,अशोक सत्रे,डॉ. सुधीर सावंत, कैलास साळुंखे, राजेश ढोले, वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे  या शिक्षकांसह ग्रामस्थ उपस्थित होते.त्यातून ५१ हजार रुपयांची कायम ठेवपावती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर धायगुडे यांच्याकडे सुपूर्द केली. (कै.) इंदूबाई यांचे पती माधवराव सावंत हे शेतकरी होते. प्रचंड कष्ट अन् मेहनतीतून त्यांनी मुलांना घडविले, स्वातंत्र्यसैनिक (कै.) शंकरराव जनोबा शिंदे गुरुजी यांच्या त्या भगिनी होत.गरजू विद्यार्थ्यांपासून वारकऱ्यांपर्यंत कित्येकांना ते सातत्याने मोलाची मदत केली आहे त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.