पुसेगाव पोलिसांची अवैध अवैद्यधंदे करणाऱ्यांवर छापेमारी सुरू धडक कारवाई 2 लाख 25 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
पुसेगाव पोलिसांची अवैध अवैद्यधंदे करणाऱ्यांवर छापेमारी सुरू धडक कारवाई 2 लाख 25 हजार 550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव ते बुध या पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या दरम्यान पुसेगाव पोलिसांच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्यासह एकूण 2 लाख 25 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.
पुसेगाव पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की माननीय जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल व अप्पर पोलीस अधिकारी अजित बोऱ्हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दहीहंडी उत्सवाचे अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यास अनुसरून दिनांक 18/ 8 /22 सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे एक लष्करी असेंट कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एम एच 11 वाय 16 15 प्रदीप सोमन्ना गौडा वय 35 राहणार पुसेगाव याचे गाडीतून वैद्य दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली, या माहितीच्या आधारे पुसेगाव ते बुध या रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत असताना संशयित चार चाकी गाडी गाडी क्रमांक एम एच 11 वाय 16 15 बुध कडून पुसेगाव कडे येत असताना पुसेगाव हद्दीत नाकाबंदी दरम्यान त्या गाडीची झडती घेत असताना 3500 च्या किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या मुद्देमाल सदर इसमाकडे दिसून आला व तो जप्त केला अधिक चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याच ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करण्यात आला असून असेंट कंपनीची चार चाकी गाडी व दारूच्या बाटल्या असा एकूण दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विपुल भोसले करीत आहेत. सदर कारवाईमध्ये सपोनी संदीप शितोळे, जगन्नाथ लबाळ, संभाजी माने, पोपट बिचुकले,विलास घोरपडे,सचिन जगताप पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करताना भाग घेतला या कारवाईबद्दल पुसेगाव परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment