एकंबे येथे सातारा जिल्हा तायक्वांदो उद्घाटन सोहळा संपन्न.
कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.
आज एकंबे तालुका कोरेगांव येथे सातारा जिल्हा तायक्वांदो असो. व एकलव्य तायक्वांदो असो.एकंबे तालुका कोरेगाव यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्पर्धेचं.. कोरेगाव खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या सुविद्य पत्नी डॉ.प्रियाताई शिंदे यांच्या शुभहस्ते जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचं उदघाटन करण्यात आलं. उदघाटन प्रसंगी वाहिनीसाहेबांनी मार्गदर्शन केलं.कार्यक्रमासाठी सुमित भडलकर सर (राष्ट्रीय खेळाडू) यांनी आयोजन केले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक adv. राजेश चव्हाण यांनी केलं. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाच पारितोषिक श्री तुषार पवार , द्वितीय क्रमांकाच पारितोषिक adv. सतीश कर्ने, तर त्रितीय क्रमांकच पारितोषिक माजी सरपंच सतीश नारायण चव्हाण यांनी दिल तर सन्मान चिन्ह सौ. प्रतिभाताई राजेश चव्हाण यांनी दिल..! सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी एकंबे गावचे लोकनियुक्त सरपंच शोभाताई कर्ने, विश्वास गुरुजी (नाना), विकास सेवा सोसायटी संचालक,गणेश शेळके(तात्या), शेल्टी गावचे सरपंच पांडुरंग संकपाळ, सायगावचे मा.सरपंच किरण घोरपडे,चेअरमन संतोष चव्हाण, गणपत चव्हाण,विष्णू संपत चव्हाण, श्रुतीन चव्हाण.वेदांत महाराज, सचिन भोसले, श्रीकांत साळुंखे,adv. राजेश पंढरीनाथ चव्हाण.इ.मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते..!!!
डॉ.प्रियाताई शिंदे यांनी एकंबे गावामध्ये झालेल्या व चालू असलेल्या विकासकामाची पाहणी केली त्यावेळी शिवराज चंद्रकांत चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.समस्थ ग्रामस्थ एकंबे.
Comments
Post a Comment