चंदीगड येथीलराष्ट्रीय कार्यशाळेत सरपंच अभय राजेघाटगे यांची निवड.
राष्ट्रीय कार्यशाळेत सरपंच अभय राजेघाटगे यांची निवड.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
बुध तालुका खटाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अभय उदयसिंह राजेघाटगे, यांना केंद्र सरकारच्या शाश्वत विकास संकल्पनेवर आधारित पायाभूत सुविधांनी युक्त ग्रामपंचायत या राष्ट्रीय कार्यशाळेत निमंत्रित केले असून चंदीगड पंजाब येथे सोमवार तारीख सोमवार २२ ऑगस्ट व मंगळवार २३ या दोन दिवस ही कार्यशाळा होणार आहे सरपंच अभय राजेघाटगे यांच्या कार्याची दखल केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने घेतली असून खटाव तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत असून कोरेगाव विधान मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे ,पुसेगावचे युवा नेते रणधीरशेठ जाधव, विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत, खटावचे युवा नेते राहुल पाटील ,भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, व विविध गावचे सरपंच ,सदस्य, चेअरमन , पदाधिकारी, पत्रकार ,वकील ,डॉक्टर, शिक्षक वर्ग विविध मंडळाचे अध्यक्ष यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment