निढळ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण.

निढळ येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहीद जवानाच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण.
 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी   यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या निढळ  सेवा सोसायटीमध्ये देशाच्या स्वातंत्र्य रोप्य महोत्सव निमित्त  शहीद जवान चंद्रकांत जाधव यांच्या  पत्नी श्रीमती पुनम चंद्रकांत जाधव कातळकेवाडी यांचे शुभ हस्ते संस्थेचा ध्वजारोहण करण्यात आला .या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन व सर्व संचालक संचालिका  संस्थेचे सचिव माजी सैनिक व बँकेचे अधिकारी वर्ग  व ग्रामस्थ व महिला उपस्थित होते .  तसेच स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त विविध कार्यकारी सेवा सोसायटी व सातारा जिल्हा बँक शाखा निढळ यांच्या संयुक्त विद्यमाने  हा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन शशिकांत  खुस्पे पाटील , निवृत्त अधिकारी सुभेदार  आनंदराव  पिंगळे ,मोहन शिंदे ,भीमराव माने व सर्व सदस्य  व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.