अण्णा भाऊ साठे नगर मधील लोंड्री (नाला )वरील किराणा माल दुकान (अतिक्रमण) हटाव मोहिम.
कोरेगांव प्रतिनिधी आज्जु मुल्ला.
तहसिल कार्यालय कोरेगाव येथे अण्णा भाऊ साठे नगर मधील लोंड्री(नाला) वरील किराणा माल दुकान (अतिक्रमण) हटवण्या बाबत
वरील विषयासरून अण्णा भाऊ साठे नगर, आर पी आय, व ग्रामस्थ कोरेगांव शहर मधील अण्णा भाऊ साठे नगर या ठिकाणी सतीश बोबडे यांचे दुकान लोंड्री वर असून त्यांनी 25-30 वर्ष लोंड्री ( नाला )वर अतिक्रमण केलं आहे.व महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या दुकाना पासून 5 प्रकारचे मार्ग (पंच मार्ग) आहे.
1) डॉ बाबासाहेब अंबेडकर नगर रोड
2) जूनी पेठ रोड
3)सम्राट गल्ली रोड
4) बाजार पेट रोड
5) रहिमतपुर रोड,
अश्या प्रकारचे वेग वेगळे मार्ग आहे. व सतीश बोबडे यांचे दुकान त्या मार्गाच्या मधीच आहे. त्यामुळे दू चाकी व चार चाकी चालवणाऱ्या लोकांना प्रवास करत असताना अंदाज येत नाही. या मुळे कित्येक वेळा तरी अपघात घडला आहे. व तिथेच जवळ अंगणवाडी आहे, त्या अंगणवाडीत शिकणारे छोटे मुलांना सुद्धा या दूकाना मुळे अंदाज येत नाही, व ते मुले घरी जाण्यास घाई गडबड करीत असतात, यामुळे छोट्या मुलांचां सुध्दा अपघात होण्याची शक्यता आहे. व सतीश बोबडे यांच्या दुकाना मुळे बाहेर चे काही लोक व मुले त्या दुकानाच्या कट्या वर बसून गुट्टका व धूम्रपान चे सेवन करतात त्यामुळे परिसरामध्ये घान होत आहे, व महत्वाचा मुद्दा म्हणजे ते बाहेरील लोक
स्त्रियांकडे व मुलींकडे वाईट नजरेने पाहताना दिसत आहे. अजून अश्या काही अनेक गोष्टी आहेत, त्या लेखी तक्रार मद्ये नमूद करता येत नाही, त्या मुळे सतीश बोबडे यांच्या दूकान लगतच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
कोरेगांव प्रशासनाला
अण्णा भाऊ साठे नगर, आर पी आय, समस्थ कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने विनंती अर्ज आहे. लोंड्री (नाला) वरील दुकान (अतिक्रमण) हटवावे, अन्यथा आम्ही सर्व जण भरपूर लोकसंख्येच्या उपस्थित नगर पंचायात कोरेगाव या ठिकाणी व कोरेगांव प्रशासनच्या विरोधात मोठया प्रमाणात उपोषण करण्यात येईल.
Comments
Post a Comment