मल्लविद्या जागृत ठेवण्यासाठी आजच्या युवा उद्योजकांनी असे उपक्रम राबवण्याची गरज जिल्हाध्यक्ष पै.अमर साबळे.
मल्लविद्या जागृत ठेवण्यासाठी आजच्या युवा उद्योजकांनी असे उपक्रम राबवण्याची गरज जिल्हाध्यक्ष पै.अमर साबळे.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
आंबवडे ता. कोरेगाव येथे विनीत साबळे या युवा उद्योजकांनी मल्लविद्या शिकणाऱ्या मल्लासांठी
दररोज माणसाचे वाढदिवस असतात , कोण काय करतो , याच्यापेक्षा आपण समाजासाठी काय करतो हे तितकेच लाख मोलाच आहे. सांगायचा भाग म्हणजे कै. पैलवान बाळकृष्ण सावळाराम साबळे यांचे नातू युवा कर्तृत्व युवा उद्योजक विनीत किरण साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आंबवडे येथे भैरवनाथ तालीम संघाच्या कुस्ती मल्लांना,5किलो तूप, 5किलो काजू, 10किलो बदाम. वाटप करण्यात आले . याप्रसंगी कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष पैलवान अमर भाऊ साबळे, कुस्ती-मल्लविद्या सातारा जिल्हा संपर्कप्रमुख पैलवान गणेश भाऊ मुळीक, रयत शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश साबळे, शेतकरी संघटनेचे श्री संजय नाना साबळे, तालमीतील वस्ताद , मल्ल, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते . आगळा वेगळा वाढदिवस पाहून विनीतही भारावून गेला. पुढच्या वर्षी त्याच्या वाढदिवसाला कुस्ती-मल्लविदे तर्फे मोठं कुस्त्याचं मैदान घेण्याचा मानस त्याचे पिताश्री श्री किरण भाऊ साबळे यांनी व्यक्त केला . तर आजच्या युवा उद्योजकांनी असे उपक्रम व स्वतःचा जन्मदिवस ,वाढदिवस तालीम संघात प्रत्येक गावागावात साजरे करावेत यामुळे मल्लविद्या जागृत राहील असे बोलताना जिल्हाध्यक्ष अमर साबळे म्हणाले.
Comments
Post a Comment