गणराया अवॉर्ड 2022 स्पर्धेत गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा पारंपारिक वाद्याचा वापर करा : डी.वाय.एसपी गणेश किंद्रे यांचे आवाहन.
गणराया अवॉर्ड 2022 स्पर्धेत गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा पारंपारिक वाद्याचा वापर करा : डी.वाय.एसपी गणेश किंद्रे यांचे आवाहन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
गणेशोत्सव अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील
गणेशमंडळांना मार्गदर्शन करताना डी.वाय.एसपी गणेश किंद्रे म्हणाले सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाकडे सर्व आवश्यक त्या परवानग्या घेऊन, गणेश मूर्तींची स्थापना करावी. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्यात यावे असे सांगितले आहे. परंतु याचा चुकीचा अर्थ घेऊ नये.त्यांनी कोरोना काळातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत असे जाहीर केले आहे. गणेशोत्सव काळात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. गावोगावी शक्यतो एक गाव,एक गणपती मूर्तीची स्थापना होईल यासाठी प्रयत्न करावेत. देखावे हे समाज उपयोगी, समाज प्रबोधनपर असावेत. देखाव्यातून किंवा कार्यक्रमातून सामाजिक,राजकीय, धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. गणपती उत्सव काळात मूर्ती जवळ मंडळाचे कार्यकर्ते रात्रंदिवस असणे आवश्यक आहेत. तसेच मिरवणूक काढताना मिरवणूक मार्गात कोणताही बदल करू नये.डॉल्बीचा वापर करू नये. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. आवाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करावे. अशा अनेक विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करून उत्सव शांततेत पार पाडावा असे गणेश किंद्रे यांनी आवाहन केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी मंडळाच्या अध्यक्षांना मार्गदर्शन करताना पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणराया अवॉर्ड 2022 स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये सामाजिक उपक्रम, डॉल्बीमुक्त मिरवणूक, सुरक्षा उपाययोजना,स्वच्छता, आशा चांगल्या उपक्रम राबवणारे 3 गणेश मंडळ व एक गाव एक गणपती योजना राबविणारे गणेश मंडळ यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन मा.पोलीस अधीक्षक यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी स्पर्धेमध्ये सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन सपोनि संदीप शितोळे यांनी देखील या वेळी केले. या मिटींगला पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीडशे ते दोनशे विविध मंडळाचे अध्यक्ष ,सदस्य. व विविध गावचे पोलीस पाटील हजर होते.
Comments
Post a Comment