भारतीय सेनेच्या जवानाने स्वतःच्या लग्नात घेतला पती-पत्नीने रक्तदानाचा उपक्रम.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त भारतीय सेने मध्ये कार्यरत असलेले नवनाथ पवार यांनी आपली पत्नी सुमन यांच्याशी विवाह कार्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
नवनाथ पवार हे शिवकार्यामध्ये अग्रेसर असणारी राजे शिवछत्रपती परिवार या संस्थेची सेवक आहेत. हा परिवार हा शिव कार्यामध्ये गड किल्ले संवर्धन आणि गरजू लोकांना मदत हे ध्येय असणारी संस्था आहे. या परिवाराचे सर्व पदाधिकारी सेवक सर्व लग्नासाठी हजर होते .नवनाथ पवार हे पुणे मधील आहेत आणि त्यांनी भारतीय लष्करामध्ये देश सेवा बजावत आहेत .आपले लग्नकार्य हे एक अनोख्या पद्धतीने साजरे व्हावे ही संकल्पना दोन्ही पती-पत्नीची होती.
15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 वी साजरी करत असल्यामुळे त्याची ओचित्य साधून दोघा पती-पत्नीने आपल्या भव्य लग्न कार्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले .रक्तदान शिबिर साठी हर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले .वधू-वर आणि स्वतः रक्तदान करून तसेच वराडी मंडळ यांनी रक्तदान करून आशीर्वाद देण्यात आले.
हर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष अप्पा घोरपडे यावेळी बोलताना सांगितले लग्नकार्यामध्ये रक्तदान शिबिर घेऊन एक आदर्श निर्माण केलेला आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे व असा उपक्रम प्रत्येक लग्न समारंभामध्ये आयोजित करण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment