फलटण शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने करावा= माजी नगरसेवक श्री अशोकराव जाधव.


फलटण शहरातील भटकी कुत्री व बेवारस गुरांचा बंदोबस्त नगर पालिकेने करावा= माजी नगरसेवक श्री अशोकराव जाधव.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसत असून त्याचा सर्व सामान्य नागरिकांना व विशेषता लहान मुलांना फार त्रास होत आहे शहरातील चौका चौकात 10ते 15 कुत्र्यांचे टोळके व भर रहदारीचे चौकात बेवारस जनावरांचे कळप बसलेले असतात त्यांचा वाहन चालकाना खूप त्रास होत आहे आता तर ही जनावरे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकावर हल्ला करू लागले आहेत त्या मुळे एखाद्या नागरिकाचे जीवास धोका होऊ शकतो. नागरिकाचा किंवा एखादे लहान मुलांचा जीव गेल्या वर नगर पालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे काय असा सवाल प्रशासनाला माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी विचारला.या प्रश्नाचा नगर पालिकेने ताबडतोब आठ दिवसाचे आत बंदोबस्त करावा अन्यथा भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे मार्फत नगर परिषदे समोर आंदोलन करण्यात येईल.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.