श्रीकृष्ण-गोविंद पथकाने फोडली रयत संघटनेची दहीहंडी; पुसेगावात गोपाळ भक्तांची मोठी गर्दी.

श्रीकृष्ण-गोविंद पथकाने फोडली रयत संघटनेची दहीहंडी; पुसेगावात गोपाळ भक्तांची मोठी गर्दी.

 पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

पुसेगाव.ता.खटाव येथे श्री सेवागिरी रयत संघटना व युवा नेते गौरव जाधव यांनी आयोजित केलेली दहिहंडी मेढा येथील श्रीकृष्ण-गोविंद पथकाच्या गोविंदांनी सात थर लावून फोडली.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री ठरलं तर मग फेम सायली उर्फ जुई गडकरी यांसह रयत संघटनेचे कार्यकर्ते, बालगोपाल, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामांकित लावणीतारकांनी नृत्याविष्कार सादर केला. यावेळी डॉल्बी साउंड आणि स्पेशल लाईट सोबतच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच खटाव-पुसेगाव भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले गेल्याने दहिहंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगली. यामध्ये श्रीकृष्ण-गोविंद पथक मेढा, दक्षिण जावली गोविंद पथक, रविवार पेठ गोविंद पथक वाई, अखिल बाजारपेठ गोविंद पथक शिरवळ, भोईराज गोविंद पथक शिरवळ यांनी सहभाग नोंदवला.श्रीकृष्ण-गोविंद पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला ५ लाख inkरुपये आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.