गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी.

गौरी आगमनाची घराघरात तयारी,महिलांची लगबग भारी.

गिरवी प्रतिनिधी, अनिलकुमार कदम.

फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील गणपती बाप्पा आगमनानंतर आता घराघरात गौरी आगमनाची चाहूल लागली आहे.महिला गौरी आगमनाची तयारी करण्यासाठी घरोघर स्वच्छता साफसफाई डेकोरेशन सजावट करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.फलटण शहर व ग्रामीण भागातील अनेक गावांतून गौरी गणपती सणाच्या निमित्ताने अखंड दिवा विद्युत रोषणाई करण्यात येते.येण सणासुदीला नेहमी प्रमाणे विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे गौरी गणपती सणाच्या दिवसांत गणपती बाप्पा अंधारात असल्याने भाविकांच्यात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.विद्युत वितरण कंपनीच्या वेळापत्रकानुसार तरी वीजपुरवठा सुरळीत चालू असणे अपेक्षित असताना अचानक घरगुती विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनतेच्या मनात तीव्र रोषाची भावना आहे.
गौरी आगमनाची तयारी फलटण शहर व ग्रामीण भागात अंतिम टप्प्यात आली आहे.गौरी सजावट करण्यासाठी फलटण शहर व ग्रामीण भागात दरवर्षी परंपरेप्रमाणे श्रध्देने महिला घराघरात तयारी करण्यात व्यस्त आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.