उत्तराखंडमधील पाऊस व पुराच्या स्थितीत अडकलेले महाराष्ट्रातील 37 जणांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले.
सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.
उत्तराखंडमधील पाऊस आणि पुराच्या स्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 जणांना आतापर्यंत सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे. यात नाशिकमधील 7 जणांचा सुद्धा समावेश आहे. नाशिकचे हे 7 लोक चारधाम यात्रेसाठी गेले होते. त्यांचे नातेवाईक पालघरचे विजय दशपुते आणि नंदूरबार येथील डॉ. शशिकांत वाणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला आणि त्यांनी तत्काळ सूत्रे हलविली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्या कार्यालयाने सुद्धा यात मोठी मदत केली. राज्य सरकार सातत्याने उत्तराखंड सरकारसोबत संपर्कात आहे.
Comments
Post a Comment