शिक्षक सेवानिवृत्त पदाधिकारी यांच्या महत्वाचे प्रलंबित प्रश्नांनावर गंभीर्यपूर्वक सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कार्यवाहीचे निर्णय.
शिक्षक सेवानिवृत्त पदाधिकारी यांच्या महत्वाचे प्रलंबित प्रश्नांनावर गंभीर्यपूर्वक सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कार्यवाहीचे निर्णय.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
गत सप्ताहात सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षांच्या विनंतीवरून सातारा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभागृहात आदरणीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले साहेबांनी बोलविलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सेवानिवृतांच्या महत्वाच्या प्रलंबित प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस सामान्य प्रशासन , वित्त विभाग व शिक्षण विभागातील अधिकारी/कार्यालयीन प्रमुख यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पेन्शन विक्री ग्रॅज्युएटी , गटविमा , प्रॉ. फंड , निवड श्रेणी , अत्युत्कृष्ट वेतनवाढी , मुख्याध्यापक > केंद्रप्रमुख > शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती वेतनवाढ , संगणक वसुली रक्कम , रजा रोखीकरण , आश्वासित प्रगती योजना , १जुलै काल्पनिक वेतनवाढ इ. विषयीं जि.प. शिक्षण विभागामार्फत गट शिक्षणाधिकारी यांच्याकरवी माहिती घेवून लागणाऱ्या प्रलंबित प्रश्नांसाठीच्या पूर्तीसाठीचा एकूण निधी मागणी करण्यात येणार असून त्याद्वारे प्रश्नांची तपासणी करून प्रश्न निकाली काढण्याचीही सूचना केली आहे.
आता प्रशासन सकारात्मक असतांना तालुका अध्यक्षांनीही सामाजिक बांधिलकीतून अशा सेवानिवृतांच्या समस्यांची वैयक्तिक टाईप केलेली स्वतंत्र माहिती घ्यावी. सर्वांच्या सोयीनुसार जिल्हा स्तरावर एकत्र गोळा करून जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात पोहोच करण्यात येणार आहे. कृपया तालुका अध्यक्षांनी याकामी अनमोल सहकार्य करावे असे जिल्हा अध्यक्ष मा.ए.खाडे यांच्या वतीने विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment