राजू शेट्टीच्या माध्यमातून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात आंदोलन करण्यात आले.
राजू शेट्टीच्या माध्यमातून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नसंदर्भात आंदोलन करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
राजू शेट्टींच्या माध्यमातून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भामध्ये आंदोलन करण्यात आले त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमच्याशी पण त्यांनी संबंधित चर्चा केली होती. खरं म्हटलं तर कोकणातला असलेला हा आंबा उत्पादक शेतकरी यावर्षी प्रचंड अडचणीत आलेला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून हुकूमशाही पद्धतीने होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो. आदरणीय पवार साहेबांनी कोकणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले होते, तशी भूमिका या सरकारची दिसत नाही, म्हणून पवार साहेबांनी सुद्धा याला पाठिंबा दिलेला आहे. जर राजू शेट्टी यांनी पुढचं आंदोलन केलं, तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असू. आम्ही सर्व कोकणातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असे आव्हान आमदार शशिकांत शिंदे केले आहे.
Comments
Post a Comment