विडणी गावाचे सुपुत्र मयुर अभंग यांची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड.

विडणी गावाचे सुपुत्र मयुर अभंग यांची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड.


फलटण तालुका प्रतिनिधी :- जुबेर भाई कोतवाल.

फलटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय कृष्णराव अभंग (उर्फ गांधी अण्णा) यांचे नातू, मयूर नंदकुमार अभंग यांनी नुकत्याच खात्यांतर्गत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे. या परीक्षेतून त्यांची 'पोलीस उपनिरीक्षक' (PSI) या पदावर निवड झाली आहे.मयुर अभंग हे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत मुंबई पोलीस दलात मयुर अभंग यांनी १४ वर्षे सेवा दिली आहे त्यामध्ये ५ वर्षे प्रतिनियुक्तीवर (CBI) सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन सेवा दिली आहे.त्यांच्या या यशाने विडणी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.मयुर अभंग यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षणःमयूर अभंग यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विद्यानगर, विडणी येथे झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथे पूर्ण केले. तर, पुढील पदवीचे शिक्षण त्यांनी 'यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक' येथून यशस्वीरीत्या पूर्ण केले.
विविध मान्यवर व ग्रामस्थांकडून कौतुकःमयूर अभंग यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई मंत्रालय येथील अवर सचिव धीरज कांतीलाल अभंग, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन अभंग, विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाला अभंग, तसेच मयुर अभंग यांच्या मित्रपरिवार,विडणी गावातील सर्व ग्रामस्थ आणि सामाजिक,राजकीय, अशा विविध क्षेत्रातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.