पुसेगाव येथे मुस्लिम समाज शुक्रवारी ईद साजरी करणार.
पुसेगाव प्रतिनिधी:- पंकज कदम.
बकरी ईद उद्या गुरुवारी (ता. २८) सर्वत्र साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने नमाज पठण आणि कुर्बानी दिली जाते. असं असलं तरी पुसेगाव येथे गुरुवारी फक्त नमाज पठण केले जाणार असून शुक्रवारी बकऱ्याची कुर्बानी दिली जाणार आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या सुवर्णनगरी पुसेगावमध्ये गुरुवारी मांसाहार विक्री आणि आहाराला बंदी आहे. येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा आहे. पुसेगावात सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी (ता. २९) बकरी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.मुस्लिम बांधवांनी सांगितले की, आमची श्री सेवागिरी महाराजांवर मोठी श्रद्धा आहे. पुसेगावमध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. हे एक तीर्थक्षेत्र आहे. त्यात ईदच्या दिवशी श्री सेवागिरी महाराजांची महाआरती असलेला गुरुवार आला आहे. त्यामुळे अशा स्थितीत कुर्बानी देणे योग्य नाही. त्यामुळे गुरुवार ऐवजी शुक्रवारी ईद साजरी केली जाईल असं मुस्लिम ट्रस्ट चे सदस्य अमिर मणेर , अमजद मुलाणी, राजू बागवान यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
Comments
Post a Comment