हिंदू मुस्लिम ऐक्य व सलोका राखणारे खटाव तालुक्यातील एकमेव गाव पुसेगाव - युवा नेते राम जाधव.

हिंदू मुस्लिम ऐक्य व सलोका राखणारे खटाव तालुक्यातील एकमेव गाव पुसेगाव - युवा नेते राम जाधव.

 पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. 

 पुसेगाव तालुका खटाव येथील श्री. परमपूज्य सेवागिरी महाराजांचे शक्तिपीठ असून येथे श्री सेवागिरी महाराजांची संजीवन समाधी आहे त्यामुळे या नगरीला अध्यात्मिक महत्त्व आहे आणि साधुसंतांनी समाजाला जी दिशा आणि मार्गदर्शन केले अध्यात्माचा मार्ग दाखवला त्या मार्गाने वाटचाल करत असताना पशुहत्य हि वर्ज केलेली असल्याने आणि पुसेगाव येते श्री सेवागिरी महाराजांचा गुरुवार हा अध्यात्मिक दिवस असल्याने संपूर्ण पुसेगाव मध्ये मांस विक्री व सेवन यास बंदी असल्याने बकरी ईद कुर्बानी ही गुरुवारी मुस्लिम बांधवांचा सण येत असल्याने तो सण त्यांनी शुक्रवारी साजरा केला आहे पुसेगाव येथील सर्व मुस्लिम बांधवांनी इतर धर्मियांचा आदर राखून गावांमधील अध्यात्मिक महत्त्व कायम राहण्यासाठी जी सहकार्याची भूमिका घेऊन पुसेगाव येथे गुरुवारी कोणत्याही प्रकारची पशु हत्या न करता शांततेत बकरी ईद चा सण साजरा करून समाजामध्ये जो शांततेचा संदेश दिला तो नक्कीच अभिनंदनी आहे अशाच प्रकारे गावांमध्ये कायम जातीय सलोखा राखून एकमेकांच्या धर्माचा सन्मान राखून सामाजिक शांतता राखल्यास सर्व धर्मांच्या प्रगतीसाठी विकासासाठी आणि गावच्या शांततेसाठी हा निर्णय एक मैलाचा दगड ठरेल असे पुसेगाव येथील युवा नेते  रामशेठ जाधव यांनी सातारा 24 तास न्यूजसी बोलताना सांगितले  आहे.'

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.