नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांच्या कार्यालयामध्ये आधार कार्ड कॅम्प चे आयोजन.

नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांच्या कार्यालयामध्ये आधार कार्ड कॅम्प चे आयोजन.

फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल.

फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा यांच्या पुढाकाराने आणि माऊली फाउंडेशन व पोस्ट ऑफिस फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड संदर्भातील कॅम्पचे शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून या आधार कार्ड कॅम्प चे आयोजन करण्यात आला असून याचा जास्तीत जास्त लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नगरसेविका सिद्धीली शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.या शिबिरामध्ये सहा महिन्यापासून अठरा वर्षापर्यंतच्या व्यक्तींचे मोफत आधार कार्ड काढून देण्यात येणार असून त्याचबरोबर आधार कार्ड मधील जन्मतारीख,फोटो,नावातील बदल इत्यादी कामे यात प्रामुख्याने करण्यात येणार आहेत.फलटण नगर पालिकेत कुमारी सिद्धाली अनुप शहा या सर्वात तरुण नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत या पूर्वीही शासनाच्या विविध योजना कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या प्रभागात यशस्वीरित्या  राबविल्या आहेत शासनाच्या प्रत्येक योजना ह्या आपल्या प्रभागात प्रभावीपणे कश्या राबविल्या जातील आणि आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकांना जास्तीत जास्त कसा लाभ होईल आपल्या प्रभागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये या साठी कुमारी सिद्धाली अनुप शहा  नेहमीच प्रयत्नशील असतात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या बरोबरच फलटण मधल्या प्रत्येक नागरिकांची कामे त्या करत असतात.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.