खासगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे; सरकारी रुग्णालयात जाहिरात झळकली.

खासगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे; सरकारी रुग्णालयात जाहिरात झळकली.

फलटण प्रतिनिधी: जुबेरभाई कोतवाल.

फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये चक्क एका खासगी हॉस्पिटलची जाहिरात लावण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील केस पेपर विभागासमोर तसेच मुख्य प्रवेशद्वारातच खासगी डॉक्टरांचा स्टँडी लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.सरकारी रुग्णालयामध्ये खासगी डॉक्टरांची चिठ्ठी देणे, बाहेरील औषधे सुचवणे अथवा रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे 'वळवणे यावर नियमानुसार बंदी असताना, थेट रुग्णालय परिसरातच खासगी हॉस्पिटलची जाहिरात झळकणे गंभीर मानले जात आहे, त्यामुळे संबंधित खासगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे,कारवाईची मागणी...
ही जाहिरात कोणाच्या परवानगीने लावण्यात आली? प्रशासनाला याची माहिती होती का? तसेच यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का? याबाबत सातारा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी
नागरिकांकडून पुढे येत आहे.रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा ठिकाणी खासगी हॉस्पिटलची जाहिरात लावल्याने सामान्य रुग्णांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.