फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न.
उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे,तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न
फलटण प्रतिनिधी - जुबेर कोतवाल.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीस प्रामुख्याने फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे उपस्थित होते.बैठकीत शांतता समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, मोहल्ला कमिटी सदस्य, पत्रकार, गोरक्षक तसेच कत्तलखाना चालवणारे व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून बकरी ईद शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले.समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरवणाऱ्यांवर तसेच आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डीवायएसपी विशाल खांबे यांनी दिला सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून कोणत्याही प्रकारचे चुकीचे संदेश, व्हिडिओ अथवा पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.तसेच बकरी ईद निमित्त तात्पुरत्या स्वरूपात कत्तलखाना चालविण्यासाठी नगरपालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. उघड्यावर जनावरांची कत्तल अथवा अवैध कत्तल आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले.शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थितांनी आपली मते व्यक्त केली.यावेळी संबंधितांना BNSS कलम 168 अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या असून परिस्थितीवर पोलीस प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांनी दिली.
Comments
Post a Comment